भूगोल - भारतातील खनिज संपत्ती

भारतातील खनिज संपत्ती :-




- खनिज संपत्तीच्या बाबतीत भारताची गणना
  खनिज संपन्न राष्ट्रात होते .
- सर्व प्रकारची खनिजे भारतात आढळतात.

● बॉक्साइट :-
• बॉक्साइटचे सर्वात जास्त उत्पादन झारखंड
  राज्यात होते.
- झारखंड नंतर छत्तीसगड राज्याचा दुसरा 
  क्रमांक लागतो .
- महाराष्ट्र, ओरिसा, मध्ये प्रदेश या राज्यातही
  बॉक्साइटचे साठे आहेत.
- अल्युमिनियमची निर्मिती बॉक्साइट पासून
   होते
- बॉक्साइटचा उपयोग प्रामुख्याने विमान व
  जहाज बांधणी तसेच सिमेंट व लोहपोलाद
  कारखान्यात होतो.
- महाराष्ट्रात बॉक्साइटचे २९ % साठे
  आढळतात.
- महाराष्ट्रात कोल्हापूर,सिंधुदुर्ग,रत्नागिरी,
  सांगली, सातारा  इ. ठिकाणी साठे आढळतात.


लोहखनिज :-
- भारत हा लोहखनिज निर्यातक देश असून
  जगातील २०% साठे भारतात आढळतात.
- लोहखनिज उत्पादनात भारताचा ६ वा क्रमांक
  लागतो.
- महाराष्ट्रात लोहखनिजचे साठे सिंधुदुर्ग, भंडारा
  चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी आढळतात.
- लोहखनिज प्रामुख्याने टॅकोनाईट व जांभा
  खडकात आढळते.
- महाराष्ट्रात २०% उत्पादन होते.
- लोहखनिजचे साठे झारखंड,प.बंगाल, 
  ओरिसा, महाराष्ट्र, आ. प्रदेश इ. राज्यात
  आढळतात .
- लोहाच्या प्रमाणानुसार लोहखनिजचे
  मॅग्नेटाईट(७२%), हेमेटाईट(६०%), 
  सिडेराईट(४८%) व लिमोनाईट (५०%)
  असे चार प्रकार पडतात.
- यापैकी भारतात हेमेटाईट या प्रकारचे साठे
  सर्वाधिक आहेत.

● दगडी कोळसा :-
- दगडी कोळसा उत्पादनात भारत जगात
  तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- भारतात झारखंड मध्ये सर्वात जास्त साठे
  आहेत.
- उत्पादनाच्या बाबतीत चीनचा प्रथम क्रमांक
  लागतो.
- कोळशातील कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी
  कोळशाचे अँथ्रासाईट(९५% पर्यंत), 
  बिट्येमाईन(८५%-९०%),
  लिग्नाइट(६५%-७५%), पीट(५०%) पेक्षा
  कमी, असे चार प्रकार पडतात.
- पश्चिम बंगालमध्ये "राणीगंज " येथे
  भारतातील
  पहिली दगडी कोळशाची खाण आहे .
- महाराष्ट्रात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, येवतमाळ
  येथे कोळशाचे साठे आढळतात.

● तांबे :-
- तांबे उत्पादनात झारखंड, राजस्थान व आंध्र
  प्रदेश यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा
  क्रमांक लागतो.
- महाराष्ट्रात नागपूर, चंद्रपूर येथे तांब्याचे साठे
  आढळतात.
- राजस्थानमधील खेत्री येथे तांब्याचे साठे
  आहे.

● अभ्रक :-
- भारत उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर 
  आहे.
- भारतात अभ्राकाचे उत्पादन झारखंड, 
  राजस्थान व आंध्र प्रदेश येथे होते.
- महाराष्ट्रात अभ्ररकाचे साठे सिंधुदुर्ग व पूर्व
  विदर्भातील काही भागात आढळतात .

● मँगनीज :-
- मँगनीज उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक
  लागतो.
- भारतात ओरिसा, झारखंड, राजस्थान,
  महाराष्ट्र, छत्तीसगड येथे प्रमुख साठे आहेत.
- महाराष्ट्रात ४०% साठे सापडतात त्यापैकी
  भंडारा , नागपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे साठे
  आहेत.

● चुनखडी :-
- चुनखडी उत्पादन मध्ये प्रदेश, महाराष्ट्र, 
  कर्नाटक , ओरिसा, कर्नाटक येथे प्रमुख
  साठे आढळतात .
- चुनखडीचा उपयोग प्रामुख्याने बांधकामात
  केला जातो.
- महाराष्ट्रात चुनखडीचे ९% साठे आढळतात.
- महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली,
  धुळे, नंदुरबार रत्नागिरी इ. साठे आहेत.

● खनिज तेल  :-
- भारत खनिज तेलाचा आयातदार देश आहे.
- खनिज तेल उत्पादनात सौदी अरेबियाचा प्रथम
  क्रमांक लागतो.
- खनिज तेल मुख्यतः चुनखडक व वालुकाश्मत
  सापडतात.
- भारतातील सर्वात मोठा खनिज तेलाचा साठा
  मुंबई हाय येथे आहे.
- भारतातील पहिला तेलसाठा आसाममधील
  दिग्बोई.
- भारतात गुजरात, आसाम, राजस्थान,महाराष्ट्र
  या राज्यातही खनिज तेल उत्पादन होते.

● सोने :-
- कर्नाटक मधील कोलार येथे भारतातील प्रमुख
  सोन्याच्या खाणी आहेत.
- आंध्रप्रदेशात सुद्धा सोन्याच्या खाणी आहेत.

● हिरे :-
- मध्ये प्रदेशातील पन्ना येथील हिऱ्याच्या खाणी
  प्रसिद्ध आहेत.
- उत्तर प्रदेशातील बंदा , मर्झापुर येथेही खाणी
  आहेत.

● क्रोमाइट  :-
- क्रोमाइटचे सर्वात जास्त उत्पादन ओरिसा
  राज्यात होते.
- आंध्रप्रदेश, झारखंड, कर्नाटक येथे सापडतात.
- महाराष्ट्रात एकूण १०% साठे सापडतात.
- महाराष्ट्रात भंडारा, सिंधुदुर्ग, गोंदिया व
  रत्नागिरी येथे साठे आहेत.


Comments