संयुक्त राष्ट्रसंघ व त्याच्या संलग्न संस्था :-

संयुक्त राष्ट्र व त्याच्या संस्था :-



• दुसऱ्या महायुद्धानंतर ही विनाशकारी युद्धे
  थांबलीपाहिजे या विचारातून २४ ऑक्टोबर
  १९४५ ला संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना
   झाली.
• २४ ऑक्टोबर हा दिवस 'संयुक्त राष्ट्र दिन'
  म्हणून साजरा केला जातो.
उद्दिष्ट्ये :-
• आंतराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता वाढवणे.
• राष्ट्राराष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध विकसित करणे.
• मानवी हक्कचे व स्वातंत्र्याचे जतन आणि
  संवर्धन करणे.
◆ संयुक्त राष्ट्राचे प्रमुख ६ घटक आहेत.

१) आमसभा :-
• सर्व सभासद राष्ट्राचे प्रतिनिधी आमसभेचे
  सभासद असतात.
• प्रत्येक राष्ट्राला एकाच मत देण्याचा अधिकार.
• श्रीमती विजयालक्ष्मी पंडित (१९५३) संयुक्त
  राष्ट्रसंघाच्या आमसभेचे अध्यक्ष पद
  भूषवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत.
• आमसभेला आंतरराष्ट्रीय शांतता व 
  सुरक्षिततेच्या प्रश्नासंबंधी ठराव मांडण्याचा
  अधिकार.

२) सुरक्षा परिषद :-
• सुरक्षा परिषदेत एकूण १५ सभासद राष्ट्रे
  असतात.
• त्यापैकी अमेरिका, फ्रान्स, इंग्लड, रशिया व
  चीन ही पाच राष्ट्रे स्थायी सभासद आहेत त्यांना
  नकाराधिकार आहे.
• या पैकी एकही राष्ट्राने एखाद्या निर्णयास
  संमती न दिल्यास तो निर्णय फेटाळला जातो.
• दहा अस्थायी  राष्ट्रची निवड दोन वर्षांसाठी
  केली जाते.
• जागतिक शांतता व सुरक्षितता राखणे व
  वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणे
  हे मुख्य कार्य.

३) आर्थिक व सामाजिक परिषद :-
• या परिषदेत एकूण ५४ सदस्य असतात.
• आर्थिक व सामाजिक कार्यात समन्वय
  साधण्यासाठी  या परिषदेची स्थापना.
• आर्थिक , सामाजिक, सांस्कृतिक , शैक्षणिक
  प्रश्ना संबंधी विविध प्रकल्प राबवणे हे मुख्य
  कार्य.

४) आंतरराष्ट्रीय न्यायालय :-
• या नायलायत एकूण १५ न्यायाधीश असतात.
• न्यायाधीशांची निवड सुरक्षा परिषद व आम
  सभा करते.
• सभासद राष्ट्रातील तंटे सोडवणे , आंतरराष्ट्रीय
  कायदे व परंपरा यांचा योग्य अर्थ लावणे इ.
  मुख्य कामे.

५) विश्वस्त मंडळ :-
- दुसऱ्या महायुद्धानंतर जी राष्ट्रे स्वतःचे शासन
  चालवण्यास असमर्थ होते त्यांना मदत करणे
  हा या मंडळाचा मुख्ये हेतू .
• १९९४ ला मंडळ बरखास्त करण्यात आले.

६) सचिवालय :-
• सचिवालयाच्या प्रमुखास संयुक्त राष्ट्राचा
  'सरचिटणीस' म्हणतात.
• निवड ५ वर्षासाठी असते.
• आमसभेच्या व सुरक्षा परिषदेच्या बैठका
  आयोजित करणे , आंतरराष्ट्रीय परिषदा भरवणे
  इ कामे.

●  संलग्न संस्था :

◆ आंतरराष्ट्रीय कामगार संघठन :-
• मुख्यालय जिनिव्हा येथे आहे .
• कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून
  आणण्याच्या दृष्टीने ही संघटना काम करते.

◆ अन्न व शेती संघटना :-
• मुख्यालय रोम येथे आहे .
• शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणे
  हे या संघटनेचे मुख्य कांम.

◆ जागतिक आरोग्य संघटना (WHO):-
• मुख्यालय जिनिव्हा येथे .
• जगातील सर्व लोकांच्या शारीरिक व मानसिक
  स्थितीत सुधारणा करणे , लसीकरणाची
  मोहीम हाती घेणे इ. कामे हि संघटना पार
  पाडते.

◆ आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग :-
• नागरी अणुशक्तीचा वापर लष्करी कारणासाठी
  केला जाणार नाही यावर लक्ष ठेवणे.

● संयुक्त राष्ट्राची महत्वाचे कामे :-
• १९७२  स्टोकहोम परिषदेत शाश्वत
  विकासाची संकल्पना .
• १९९२ वसुंधरा परिषदेचे आयोजन .
• १९९७ पर्यावरणा संबंधी "क्योटो प्रोटोकॉल"
  करार - २००२ साली स्वीकारण्यात आला.
• ८ मार्च हा "आंतरराष्ट्रीय महिला दिन"  
  म्हणून घोषित तर १९७५ हे महिला वर्ष म्हणून
  घोषित .
इत्यादी महत्वाची कामे संयुक्त राष्ट्राकडून केली
गेली .



Comments