◆ स्वातंत्र्य चळवळी : भाग १
★ कारणे :-
• भारताचे आर्थिक शोषण .
• पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव - या शिक्षणातून
भारतीय तरुणांनी बुद्धिनिष्ठा, मानवता, समता,
स्वतंत्र, लोकशाही, राष्ट्रवाद इ. मूल्य आत्मसात
केली.
• वृत्तपत्रे, नियतकालिके व साहित्य :-यातील
देशाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय
परीस्थिती संबंधी लेखातून लोकजागृती झाली
• ब्रिटिशांची श्रेष्ठत्वाची भावना .
इत्यादी कारणांनी स्वातंत्र्य चळवळीची
पायाभरणी केली .
• १८८३ ला सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी
कोलकात्याला राष्ट्रीय परिषद भरवली .
- या अधिवेशनाला १०० प्रतिनिधी उपस्थित
होत.
• राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना -
- मुंबईतील गोकुलदास तेजपाल संस्कृत शाळेत
२८ डिसें १८८५ ला राष्ट्रीय सभेचे पहिले
अधिवेशन.
- अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते.
- ७२ प्रतिनिधी उपस्थित .
• बंगालची फाळणी व वंगभंग आंदोलन :-
- १९०५ ला लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी
जाहीर केली.
- मुस्लिम बहुसंख्याक असलेला पूर्व बंगाल व
हिंदू बहुसंख्याक असलेला पश्चिम बंगाल असे
विभाजन करण्याची योजना.
- १६ ऑक्ट. हा फाळणीचा दिवस " राष्ट्रीय
शोकदिन" म्हणून पाळण्यात आला.
- एकतेचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम
घेण्यात आला.
- परदेशी माल व शिक्षण यांवर बहिष्कार .
- १९०५ च्या अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी,
बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हि चतुः सुत्री
स्वकरण्यात आली.
- १९११ ला लॉर्ड हार्डिंग्जद्वारा भारवलेल्या
दिल्ली दरबारात पंचम जॉर्ज याने बंगालची
फाळणी रद्द केली.
- १९०७ च्या सुरत अधिवेशनात राष्ट्रीय सभेत
जहाल व मावळ गटात फूट पडली .
- १९१६ साली दोन्ही गट एकत्र आले तसेच
मुस्लिम लीग व राष्ट्रीय सभा एकत्र येऊन
"लखनौ करार" अस्तित्वात आला
- करारा नुसार मुस्लिमांच्या विभक्त मातदार
संघाना राष्ट्रीय सभेची मान्यता.
• मुस्लिम लीगची स्थापना :-
- "फोड व राज्य करा" या नितीखाली ब्रिटिशांनी
हिंदू - मुस्लिम यांच्यात फूट पडण्यासाठी
मुस्लिमांना स्वतंत्र राजकीय संघटना
काढण्यास चिथावले .
- आगाखान यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ
लॉर्ड मिंटो यांना भेटले .
- १९०६ ला "मुस्लिम लीगची " स्थापना झाली.
- सलीमुल्ला खान मुस्लिम लीगचे संस्थापक
व अध्यक्ष होते.
- मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष
मुश्ताक हुसौन होते.
• १९०९ चा मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा:-
- कायदेमंडळातील भारतीय प्रतिनिधींची संख्या
वाढवण्यात आली.
- काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश
कायदेमंडळात करण्यात आला.
- मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण
करण्यात आले.
• होमेरुल चळवळ :-
- डॉ.ऐनी बेझंट व बा.ग. टिळक यांनी
चळवळीची सुरुवात केली.
- या प्रकारची चळवळ आयर्लंड या देशात झाली
होती .
• १९१७ ला " ब्रिटिश सरकार भारताला
टप्याटप्याने स्वशासनाचे अधिकार व जबाबदार
राज्यपद्धती देईल" अशी घोषणा भारतमंत्री
मॉन्टेग्गु यांनी केली.
• १९१९ ला भारतात घटनात्मक सुधारणा
घडवून आणण्यासाठी मॉंटेग्यु चेल्म्सफोर्ड
कायदा मंजूर.
- कायद्यान्वे प्रांतिक पातळीवर काही
बिनमहत्वाची खाती भारतीय मंत्र्यांकडे
सोपवण्यात आली.
- " हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही
नव्हे " या शब्दात लो. टिळकांनी या
कायद्यावर टीका केली.
• गांधी पर्व :-
- १९१५ मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून
भारतात आले.
- १९१७ ला बिहारमधील चंपारण्यातील
शेतकऱ्यांसाठी सत्याग्रह.
- १८१८ मध्ये खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी
साराबंदीची चळवळीचे नेतृत्व स्वीकारले.
- विनाचौकशी अटक करण्याची तरतूद
असलेल्या १९१९ च्या रौलेट कायद्याला
विरोध .
• १३ एप्रिल १९१९ ला जलियनवाला बाग
हत्याकांड.
- बैसाखी सणाच्या निमित्ताने आयोजित
केलेल्या सभेवर जनरल डायरने गोळीबार
केला.
- हत्याकांडास पंजाबचा शासक मायकल
ओडियार जबाबदार.
- हत्याकांडाच्या निषेधात रवींद्रनाथ टागोर यांनी
आपल्या "सर" ह्या पदवीचा त्याग केला.
- हत्याकांडाच्या चौकशीसाठी हंटर कमिशन
नियुक्त.
• असहकार चळवळ (१९२०) :-
- १९२० च्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने
असहकार चळवळीच्या ठरावाला मान्यता
दिली.
- चळवळीची सूत्रे गांधीजीकडे.
- देशात राष्ट्रीय शिक्षण देणारे शाळा-
महाविध्यालये स्थापन करण्यात आले.
- न्यायालायवर बहिष्कार टाकण्यात आला.
- १९२२ च्या चौरीचौरा येथील हिंसक घटने
मुळे गांधीजींनी ही चळवळ स्थगिती दिली.
• स्वराज्य पक्ष :-
- १९२२ मध्ये मोतीलाल नेहरू व चित्तरंजन
दास यांच्या द्वारा स्थापना .
- १९२३ च्या निवडणुकीत पक्षाचे अनेक
उमेदवार निवडून आले.
• १९२७ साली भारतीयांनी सुधारणा कायदा
देण्यासाठी सायमन कमिशनची नियुक्ती
करण्यात आली.
• नेहरू रिपोर्ट :-
- भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार
करू शकत नाहीत अशी टीका भरातमंत्री
बर्कनहेड याने केली.
- टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी मोतीलाल नेहरू
यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समिती
स्थापन करण्यात आली व एक अहवाल तयार
केला त्याला नेहरू अहवाल म्हणतात.
- वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे असा प्रस्ताव
या अहवालात होता.
Comments
Post a Comment