महाराष्ट्रातील सुधाराक :- भाग २




महाराष्ट्रातील सुधाराक :- भाग २

१) महात्मा फुले :-
  • महात्मा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली पुण्यात झाला.

  • फुलेंच्या मनावर जिस्टिस अँड ह्युम्यानिटी, कॉमनसेन्स, राईट्स ऑफ मॅन, एज ऑफ रिझन थॉमस पेन यांच्या या पुस्तकांचा प्रभाव होता.

  • “The World is My Country, My Religion Is To Do Good’  हे थॉमस पेन यांचे वाक्य म. फुलेंच्या सामाजिक व धार्मिक सुधारणेसाठी प्रेरक ठरले.

  • १८४८ ला त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा चालू केली व १८५२ ला दलितांसाठी शाळा चालू केली.

  • हंटर कमिशन पुढे साक्ष देताना ‘प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी मागणी केली.

  • १८८८ च्या राजदरबारात पारंपरिक शेतकरी वेषात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मडले.
  • त्यांच्या राहत्या घरी त्यांनी बालहत्या प्रतिबंधगृहाची स्थापना केली.

  • अस्पृश्याना पिण्यासाठी त्यांचा स्वतःचा  पाण्याचा हौद खुला केला.

  • १८७६ ते १८८२ या कालावधीत त्यांनी पुणे    नगरपालिकेचे सदस्य म्हणून काम पाहिले.

  • बालविवाह, केशवपन, वर्णव्येवस्था , स्त्रीदास्य इ ला विरोध केला तर विधवापुनर्विवाह,स्त्रीशिक्षण, समता, इत्यादींचा पुरस्कार केला.

  • त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या.

  • १९ मे १८८८ मुंबईतील जनतेने त्यांचा सत्कार करून त्यांना महात्मा पदवी बहाल केली.

  • शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ ‘ गुलामगिरी ‘ या पुस्तकांत मांडली.

  • २४ सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

◆  सत्यशोधक समाज :-
  • ब्राह्मणाच्या  सामाजिक व धार्मिक हक्कानं
            आवाहन .
  • परंपरा व अंधश्रद्धा यांना विरोध.
  • सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी दीनबंधू हे
      साप्ताहिक चालू झाले. १८८३ मध्ये ‘दीनबंधू’
      ने  ‘शेतकऱ्याचा आसूड’ हा ग्रंथ छापला.
  • सामाजिक व धार्मिक गुलामगिरी नष्ट करण्याचा
      प्रयत्न.
  • १९११ ला कोल्हापूर मध्ये शाखा स्थापन झाली.
  • पुढे  राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक
      समाजाचे कार्य पुढे नेले.

◆  सत्यशोधक समाजाची तत्वे :-
  • सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत.
  • ईश्वर एकाच आहे व तो निर्गुण आणि निराकार आहे.
  • परमेश्वराची प्रार्थना करण्यास मधेस्थांची किंवा पुरोहिताची गरज नाही.
  • ईश्वराची भक्ती आणि प्रार्थना करण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला आहे.
  • कोणताही धर्मग्रंथ ईश्वरनिर्मित नाही . सर्व धर्म ग्रंथाची निर्मिती माणसानेच केली आहे.

  ●    महात्मा फुलेंची ग्रंथसंपदा- गुलामगिरी,
        सार्वजनिक  सत्यधर्म, ब्राम्हणाचे कसब इ.

  ●   महात्मा फुले यांचा मृत्यू २८ नोव्हें. १८९०    
        साली झाला.


२) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे :-
  • वि. रा.शिंदे १८७३ ला कर्नाटक मधील जामखंडी या गावात झाला.
  • बडोदा संस्थानात सयाजीराव गायकवाड यांची दिवाणपदाची नोकरी नाकारली.
  • प्रार्थना समाजाच्या कार्यात मदत.
  • अँम्स्टरडॅम् येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेत’ प्रतिनिधी म्हणून ‘हिंदुस्थानचा उदार धर्म ‘ हा निबंध सादर केला.
  • ऑक्टोबर १९०६ ला मुंबईत त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. याचे अध्यक्ष न्या.चंदावरकर होते.
  • १९१२ ला पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मध्ये अस्पृश्य व ब्राम्हण यांचा सहभोजनाचा कर्यक्रम घेतला.
  • गरिबांना नोकऱ्या मिळवून देणे, त्त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणे या हेतूने त्यांनी “भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळाची” स्थापना केली.
  • होळकरांच्या मदतीने त्यानीं अस्पृशांसाठी पुण्यात अहिल्याश्रमाची स्थापन केली.
  • त्यांनी १९१८ मध्ये सयाजीराव गायकवाड यांच्या अधेक्षतेखाली मुंबईत ‘अस्पृश्यता निवारक परिषद’ घेतली.
  • गांधीजींच्या अधेक्षतेखाली १९२० ला ‘अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद’ घेतली.
  • कलकत्ता येथील ब्राम्हो मिशनिरी सभेत त्यांनी “मी बौद्ध आहे ‘ असे म्हंटले.
  • १९४४ ला त्यांचा मृत्यू झाला.


३) म. धोंडो केशव कर्वे :-

  • यांचा जन्म १८ एप्रि १८५८ ला रत्नागिरी जिल्ह्यात झाला.
  • १८९३ ला वर्ध्यात विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. पुढे १८९४ ला याचा संस्थेचे नाव ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ ‘ असे करण्यात आले.
  • १९०७ ला हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना केली.व १९१६ ला महिला विद्यापीठाची स्थापना करून नाथबाई दामोदर ठाकसी हे विठ्ठलदास ठाकसी यांच्या आईचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले.
  • १८९६ ला पुण्यातील भिडे वाड्यात अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केली. विधवांना शिक्षण देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्या दुःखाचे निवारण करणे इत्यादी कामे या संस्थे मार्फत करणात येत.
  • १९१५ ला महिला आश्रमाची स्थापना केली.
  • १९०७ ला त्यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली. निष्कम बुद्धीने तन, मन, धन अर्पण करणारा संघ निर्माण करून त्याचा विस्तार करणे हे या संस्थेचा मुख्ये उद्देश होता.
  • १८९३ गोदुबाई नावाच्या विधवेशी विवाह करून त्यांनी त्यांची कृती आचरणात आणली.
  • १९३५ साली त्यांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली.
  • १९५८ साली त्यांना भारत सरकारचा ‘भारतरत्न ‘ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  • ९ नोव्हें. १९६२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


४) राजर्षी छत्रपती शाहू महाराज :-

  • शाहू महाराजांचा जन्म १८७४ ला झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे हे होते.
  • महाहाराजांवर महात्मा फुले त्यांच्या विचारांचा प्रभाव होता.
  • १८९९ च्या वेदोक्त प्रकरणानंतर मराठा समाजातील पुरोहित तयार करण्यासाठी त्यांनी १९२० ला श्री शिवाजी वैदिक विद्यालय चालू केले.
  • १९०२ साली कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकऱ्यात ५०% जागा राखून ठेवल्या.
  • १९१३ मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळेची सुरवात केली.
  • महार वतने रद्द करून त्या जमिनी अस्पृश्याच्या नांवावर केल्या.
  • १९०७ मध्ये त्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क नावाचे वसतिगृह चालू केले.
  • मराठा विद्यार्थ्यांसाठी ‘व्हिक्टोरिया’ हे वसतिगृह चालू केले.
  • १८९६ ला सर्व जातीजमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालू केले.
  • १९११ ला सर्व अस्पृशांसाठी मोफत शिक्षण देण्याची तरतूद केली.
  • १९२० मध्ये डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आलेल्या माणगाव येथील पहिल्या अस्पृश्याच्या परिषदेत ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
  • १९२० ला अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद शाहू महाराजांच्या अध्यक्षतेत नागपूर येथे झाली .
  • आरक्षणाचे जनक समजल्या जाणाऱ्या या सुधरकाचा मृत्यू ६ मे १९२२ ला झाला.

५)  ५) डॉ.बी.आर.आंबेडकर :-
  • यांचा जन्म १४ एप्रि. १८९१ ला मध्ये परदेशातील महू या गावी झाला.
  • १९२० ला माणगाव येथे अप्पासाहेब पाटील यांच्या मदतीने भरलेल्या पहिल्या अस्पृश्य परिषदेचे अध्येक्ष होते.
◆ २० जुलै १९२४ ला बहिष्कृत हितकरणी  
   सभेची स्थापना झाली.
  • या सभेची  बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रसार करणे, त्यांची आर्थिक स्थती सुधारणे, समाजात जनजागृती करणे इ. प्रमुख उद्दिष्ट्ये होती. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हे या सभेचे ब्रीदवाक्य होते.
  • १९२५ ला सोलापूर मध्ये या सभेने पहिले वसतिगृह चालू केले.
●  १९२३ ला सी.के.बोले यांनी मुंबई  
   विधीमंडळात सार्वजनिक ठिकाणी
   मुक्तसंचार असावा असा ठराव पास करून   
   घेतला .
● याच्या अंमलबजावणीसाठी महाड येथील  
   चवदार तळ्याचे पाणी पिऊन सत्याग्रह केला.
  • १९२७ मनूस्मृती चे दहन केले.
  • १९२९ ला पर्वतीमंदिर सत्याग्रह केला.
  • १९३० रोजी नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्यात आलं व १९३४ ला हा सत्याग्रह मागे घेण्यात आला.
  • १९३० च्या पहिल्या गोलमेज परिषदेत अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित.
  • अस्पृशांसाठी स्वतंत्र मतदार संघाच्या तारतुदीवरून गांधी- आंबेडकर यांच्यात १९३२ ला पुणेकरार.
  • १९४५ ला पीपल्स एज्युकेशन सोसिसटी ची स्थापना. या संस्थेमार्फत सिद्धार्थ कॉलेज सुरु.
  • १९५० ला औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची स्थापना.
  • १९१९ च्या लॉर्ड साऊथबेरो समितीपुढे अस्पृश्याच्या राजकीय हक्काची मागणी.
  • १९३६ ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.
  • १९४२ ला शेड्युलकास्ट फेडरेशनचीे स्थापना.
  • त्यांची बंगाल विधीमांडळातून घटना समितीवर निवड झाली.
  • घटना समितीतील मसुदा समितीचे अध्येक्ष म्हणून काम.
  • भारतीय घटनेचे शिल्पकार” म्हणून त्यांचा गौरव.
  • त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘भारतरत्न’  या पुरस्काराने गौरविण्यात आले
  • ६ डिसें.१९५६ ला त्यांचे निधन झाले.

Comments