महाराष्ट्रातील सामाजिक संघटना

महाराष्ट्रातील संघटना :-



१) परमहंस सभा :-
  • परमहंस सभा स्थापन होण्यापूर्वी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सुरत येथे “मानवधर्म सभा” स्थापन केली होती.
  • दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी १८४९ ला परमहंस सभेची स्थापना केली.

  • परमहंस सभेची मुख्ये उद्दिष्ठे :
  1. जातीसंथा नष्ट करणे.
  2. मूर्तिपूजा बंद करणे.
  3. दलित वर्गात शिक्षणाचा प्रसार.
  4. स्त्रीशिक्षणाला महत्व .

  • सभेचे सदस्यत्व घेताना गुप्तता पाळण्यात येत असे व नाव गुप्त ठेवण्यात येत असे.
  • नाव नोंदणी करताना जातपात न पाळण्याची शपथ देऊन ख्रिश्चनांच्या हातचा पावाचा तुकडा खायला देण्यात येत असे.
  • दादोबांचा “परम हौसिक ब्रम्हधर्म” हा या सभेचा प्रमुख ग्रंथ होता.
  • १८८० नंतर सभा बंद झाली.


२) ब्राम्हो समाजाचे महाराष्ट्रातील कार्य :-
  • ब्राम्हो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी बंगाल मध्ये केली.
  • १८६७ पासून न्या.रानडे व भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात या संस्थेचे कार्य चालू झाले व ब्राम्हो समाजापासून प्रेरणा घेऊन त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.

३) प्रार्थना समाज :-
  • १८६७ साली डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी बोलावलेल्या ‘समविचारी लोकांच्या सभेत’ चर्चेअंती ‘प्रार्थना समाजाची’ स्थापना झाली .
  • प्रार्थना समाजाचे अध्यक्ष आत्माराम होते.
  • रानडे याला ‘जुन्या भागवत धर्माची शाखा’ म्हणत.
  • रानडेनीं प्रार्थना समाजासाठी “Love Of God, In The service Of Man” हे घोष वाक्य ठरिवले.

प्रार्थना समाजाची तत्वे :-
  1. समाजाची नैतिक प्रगती करणे.
  2. परमेश्वर एकाच असून तो सृष्टीकर्ता होय.
  3. प्रेम व ईश्वरावर श्रद्धा हीच खरी भक्ती.
  • मुंबईत प्रार्थना समाजाची मंदिरे बांधली गेली.
  • सातारा जिल्ह्यात महर्षी विठ्ठल रा. शिंदे यांनी प्रार्थना समाजाचे कार्य केले. 

४) आर्य समाज  :-
  • स्वामी दयानंद सरस्वती यांनी १८७५ ला मुंबई येथे “आर्य समाजाची” स्थापन केली.
  • आर्य समाजाची मूळ दहा तत्वे होती .

  1. परमेश्वर एक आहे . तो सर्वशक्तिमान, अनादी, अनंत, निराकार, सर्वसाक्षी व दयाळू आहे .

  1. तो सर्व ज्ञानी आदी उगम असून सर्व वस्तू परमेश्वराच्या स्वरूपात आहेत.

  1. त्याच्यावर श्रद्धा ठेवून प्रत्येकजण त्याचे सानिध्य मिळवू शकतो त्यासाठी मध्यस्थाची गरज नाही.

  1. सर्व ज्ञानाचे भांडार वेद आहेत.

  1. वेद ईश्वरप्रणित असून त्यांचे वाचन व  श्रवण प्रत्येक आर्यांचे कर्तव्ये आहे.

  1. वेदांना प्रामाण्य मानून ‘वेदाकडे चला’ ही घोषणा.

  1. सत्याचा स्वीकार व असत्याचा त्याग करावा.

  1. नीतीने वागा, अनितीचा त्याग करा .

  1. अज्ञान नष्ट करून ज्ञानप्रसार करावा.

  1. प्रत्येकाने स्वार्थाला दुय्यम मानावे.

  • आर्य समाजाने मूर्तीपूजेला विरोध केला व अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा यातील बुद्धीच्या कसोटीवर न पटणाऱ्या गोष्टी नाकारल्या.

५) थिऑसॉफिकल सोसायटी :-

  • सोसायटीची स्थापना १८७५ ला न्यूयॉर्क मध्ये झाली.

  • थिऑसॉफिकलचे संस्थापक मॅडम व्लव्हाटस्की व कर्नल ऑलकॉट १८७९ ला मुंबईत एक व्याख्यान दिले .

  • १८७९ ला मुंबईत शाखा चालू झाली. या शाखेचे अध्यक्ष मालवणकर होते तर प्रमुख व्यवस्थापक लोकहितवादी हे होते.

  • १८८२ ला मद्रास येथे अँनीं बेझंट यांनी शाखा स्थापन केली.

By : वेध स्पर्धापरिक्षचे

Comments