■ सविनय कायदेभंग चळवळ व छोडो भारत आंदोलन :-
◆ पार्श्वभूमी :-
• लाहोर अधिवेशनात गांधीजीकडे कायदेभंग
चळवळीचे अधिकार देण्यात आले.
• मिठावर कर.
• सरकारकडे दारूबंदीची मागणी.
• गांधीजीद्वारा मिठाचा कायदा मोडून कायदेभंग
चळवळीची सुरुवात केली.
◆ स्वरूप :-
• १२ मार्च १९३० रोजी ७८ सहकाऱ्यां सोबत
३८५ किमी. साबरमती ते दांडी अशी पदयात्रा.
• ६ एप्रिल १९३० ला दांडी येथील
समुद्रकिनाऱ्यावर मिठाचा कायदा मोडला.
● सोलापूरचा सत्याग्रह :-
• सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार
आघाडीवर होते.
• सोलापूरला लष्करी कायदा लागू करण्यात
आला.
• सत्याग्रहात भाग घेतंल्यामुळे मालप्पा धनशेट्टी
श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुस्सेन व जगनाथ शिंदे
यांना फाशी देण्यात आली.
● गांधीजींच्या अटकेेनंतर गुजरात मधील
धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी
नायडू यांनी केले.
● महाराष्ट्रात बिळाशी, संगमनेर, कळवण, पुसद
इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले.
● परदेशी मालाच्या दुकानासमोर व दारूच्या
दुकानासमोर निदर्शने करण्यात स्त्रिया
आघाडीवर होत्या.
● पहिली गोलमेज परिषेद :-
• १९३० ला भारताशी संबंधीत घटनात्मक
प्रश्नांचा विचार करण्यासाठी ब्रिटिश प्रधानमंत्री
रॅम्से मॅकडोनॉल्ड गोलमेज परिषद आयोजित
केली .
• राष्ट्रीय सभेने या परिषदेत सहभाग घेतला
नाही.
● गांधी-आयर्विन करार :-
• करारानुसार सरकारने भारताच्या प्रास्ताविक
राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्दतीचा
स्वीकार करण्याची हमी दिली.
• सविनय कायदेभंग चळवळ मागे घेऊन ,
दुसऱ्या गोलमेज परिषदेस हजर राहण्याचे
मान्य.
● दुसरी गोलमेज परिषद :-
• १९३१ ला दुसरी गोलमेज परिषद झाली.
• राष्ट्रीय काँग्रेस चे प्रतिनिधी म्हणून गांधीजी या
सभेला उपस्थित .
• गांधीजीने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली.
• परिषदेत सरकारद्वारे अल्पसंख्याकांचा प्रश्न
उपस्थित केला गेला.
• १९३२ च्या तिसऱ्या गोलमेज परिषदेवर
काँग्रेसने बहिष्कार टाकला . - एकूण ४६
प्रतिनिधी उपस्थित .
● दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर रॅम्से
मॅकडोनॉल्ड यांनी जातीय निवडा जाहीर
केला.
• यात दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघांची
तरतूद.
• याच्या विरुद्द येरवाड्याच्या तुरुंगात गांधीजीचे
आमरण उपोषण .
• १९३२ गांधी- आंबेडकर यांच्यात पुणे करार.
• पुणे करारानुसार विभक्त मतदारसंघा ऐवजी
दलितांना विधीमंडळात १४८ राखीव जागा.
● १९३४ ला गांधीजीने सविनय कायदेभंग
चळवळ मागे घेतली.
■ छोडो भारत आंदोलन :-
◆ पार्श्वभूमी -
● १९३५ चा कायदा -
• या कायद्यानुसार १९३७ ला देशातील ११
प्रांतामध्ये निवडणुका झाल्या.
• ८ प्रांतात राष्ट्रीय सभेची मंत्रिमंडळे निवडून.
• १९३९ ला राजीनामा.
● १९४२ ला मुंबईत मौलाना आझाद यांच्या
अध्यक्षतेखाली भरलेल्या अधिवेशनात छोडो
भारत चळवळीचा ठराव समंत झाला.
● गांधीजींची "करेंगे या मरेंगे" ही घोषणा या
अधिवेशनात.
◆ वैयक्तिक सत्याग्रह :-
• युद्धविरोधी प्रचार करण्यासाठी प्रत्येकाने
वैयक्तिक सत्याग्रह केला.
• पहिला वैयक्तिक सत्याग्रह विनोबा भावे
यांनी केला.
◆ क्रिप्स योजना :-
• जपानच्या फौज भारताच्या पूर्व सीमेजवळ
आल्या .
• भारताचे सहकार्य मिळवण्यासाठी १९४२ ला
सर स्ट्रॅफोर्ड क्रिप्स भारतात आले.
• पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा योजनेत उल्लेख
नव्हता म्हणून काँग्रेसकडून योजनेला नामंजूरी.
◆ आंदोलनास सुरुवात -
• आंदोलनाच्या सुरवातीलाच प्रमुख नेत्यांना
अटक करण्यात आली .
• १९४२ च्या शेवटी आंदोलनाचे नेतृत्व भूमिगत
झालेल्या तरुण समाजवादी कार्यकर्त्याकडे.
• रायगड जिल्ह्यातील भाई कोतवाल यांनी
" आझाद दस्ता " व नागपूरच्या जनरल
तिवारी यांनी लाल सेना स्थापली .
• आंदोलनाच्या बातम्या व देशभक्तीपर भाषणे
प्रक्षेपित करण्यासाठी मुंबईत विठ्ठल जेव्हेरी व
उषा मेहता यांनी आझाद रेडिओ चालू केले.
• बंगाल मधील मदिनापुर, उत्तर प्रदेश बालिया
व आझमगड , बिहार मध्ये भगलपुर व पूर्णिया
प्रतिसरकारे स्थापन .- साताऱ्यात क्रांती सिंह
नानापाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केले.
• या आंदोलनांना "ऑगस्ट क्रांती" असेही
म्हणतात.
नोट :- उद्याच्या भागात सशस्त्र क्रांतिकारी चळवळीवर लेख येईल अवश्य वाचा..!
Comments
Post a Comment