- बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म १८१२ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पोम्बर्ले येथे झाला.
- मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणूनही यांची ओळख.
- सुरवातीला ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये त्यांनी डेप्युटी सेक्रेटरी म्हणून नोकरी केली.
- तसेच अक्कलकोटच्या युवराजच्या शिक्षक म्हणूनही काही काळ काम पाहिले.
- एल्फिन्स्टन कॉलेजात असिस्टं प्रोफेसर, मुंबई इलाख्यात शाळा तपासणीस अशा वेगवेगळ्या पदावर काम पाहिले.
- १८३२ ला ‘दर्पण’ हे पहिले मराठी पाक्षिक व १८४० ला ‘दिग्दर्शन’ मासिक चालू केले.
- अनेक ग्रंथाचे इंग्रजीतून लेखन करणारे ते पहिले भारतीय होते.
- धर्मांतरितांची शुध्दी करून त्यांना स्वधर्मात परत घेतले.
- १८४६ ला बनेश्वर येथे यांचा मृत्यू झाला.
- त्यांची ग्रंथसंपदा- शून्यलब्धी, हिंदुस्थानचा इतिहास, सारसंग्रह, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास इंग्लंड चा इतिहास इ.
२) दादोबा पांडुरंग तर्खडकर :-
- ‘मराठी भाषेचे व्याकरण’ या ग्रंथाच्या रचनेमुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात .
- जावंरा संस्थानाच्या नावाबाचे शिक्षक , ट्रेनिंग कॉलेजचे संस्थापक , डेप्युटी कलेक्टर व बडोदा संस्थानात ट्रान्सलेटर अशी विविध पदे त्यांनी भूषवली .
- त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सरकारने ‘रावबहाद्दूर’ ही पदवी दिली.
- १८४३ साली त्यांनी धर्म विवेचन हे पत्रक काढले.
- १८४९ ला त्यांनी परमहंस सभेची स्थापना केली.
★ परमहंस सभेची तत्वे :-
- जातिसंस्था नष्ट करणे.
- मूर्तिपूजा बंद करणे.
- विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन .
- दलित वर्गात शिक्षणाचा प्रसार करणे.
- स्त्री शिक्षणाला महत्व .
★ दादोबांची सप्ततत्व प्रणाली :-
- ईश्वर एकाच असून त्याची भक्ती करावी.
- ईश्वरनिष्ठतेतच खरा धर्म आहे. निष्ठा ही प्रेम व नैतिक वर्तनावर अवलंबून असते.
- सर्व जगाचा धर्म एकाच आहे.
- प्रत्येक व्यक्तीला विचारस्वातंत्र्य आहे.
- आपले दैनंदिनी कार्य तर्कसुसंगत व निरक्षित विवेकवर आधारित असावे.
- संपूर्ण मानवजात एक आहे.
- सर्वांना योग्य ज्ञान दयावे.
३) जगन्नाथ शंकरशेठ :-
- यांचा जन्म १८०३ ला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे झाला.
- मुंबईचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख निर्माण केली.
- १८२२ मध्ये त्यांनी बॉम्बे नेटिव्ह स्कूलची स्थापना केली . १८५२ मध्ये तिचेच ‘बॉम्बे एज्युकेशन सोसायटी’ मध्ये रूपांतर झाले.
- १८२७ मध्ये त्यांनी उच्च शिक्षणासाठी एल्फिन्स्टन फंड गोळा केला.
- मुंबई इलाख्यातील बोर्ड ऑफ एज्युकेशनचे च्या स्थापने नंतर त्यांना त्याचे सदस्यत्व देण्यात आलं.
- १८४५ ला त्यांनी ‘स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेत त्यांनी दादाभाई नौरोजी व दाजी भाऊ लाड यांना आर्थिक मदत केली.
- काही काळ ते मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य होते.
- १८४८ साली मुंबईत त्यांनी मुलींची शाळा चालू केली.
- सन १८५७ ला ‘दि जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट अँग्लो व्हर्नयकुलर स्कूल’ ची स्थापना केली.
- दादाभाई नौरोजी सोबत त्यांनी १८५२ ला बॉम्बे असोशिएशन ही राजकीय संस्था चालू केली.
- १८ ऑक्टोबर १८६५ रोजी त्यांचे निधन झाले.
४) लोकहितवादी : -
- लोकहितवादींचा जन्म १८२३ साली पुण्यात झाला.
- त्यांचे मूळ नाव गोपाळ हरी देशमुख असे होते.
- त्यांनी ट्रान्सलेटर, शिरस्तेदार, सबअसिस्टंट कमिशनर (पुणे), असिस्टंट कमिशनर (सातारा) आणि १८५६ ला इनाम कमिशनर, स्मॉलकॉज जज्ज (१८६३), जॉईंट शेशन जज्ज (नाशिक), डिस्ट्रिक्ट जज्ज तसेच एक वर्ष रतलांम संस्थानाचे दिवाण या सर्व पदांवर त्यांनी काम केले.
- भाऊ महाजन यांच्या प्रभाकर मध्ये त्यांनी शतपत्रे लिहली.
- लोकहितवादिनीं प्रभारकार, ज्ञानप्रकाश , ज्ञानोदय, बॉम्बे टाइम्स, दि थिऑसॉफिस्ट, बुद्धिप्रकाश अशा वृत्तपात्रातून त्यांनी लेखन केले.
- त्यांची ग्रंथसंपदा- गीतातत्व, भिक्षुक, जातीभेद, पदनाम, पुष्पनामा, कालयुग, लक्ष्मीज्ञान, लंकेचा इतिहास, बोधजग, सरकारचे चाकर, इत्यादी.
- ९ ऑक्टोबर १८९२ साली त्यांचा मृत्यू झाला.
५) भाऊ दाजी लाड :-
- भा.दा.लाड यांचा जन्म १८२४ ला गोव्यात झाला.
- कुष्ठरोगावर औषध शोधून काढल्यामुळे त्यांची ‘धन्वंतरी’ म्हणून ओळख निर्माण झाली.
- १८५२ साली बॉम्बे असोसिएशन व ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन करण्यात दादाभाई नौरोजींना त्यांनी मदत केली.
- काही काळ एल्फिन्स्टासी इंस्टिट्यूट मध्ये त्यांनी विज्ञान या विषयाचे शिक्षक म्हणून नोकरी केली.
- १८४५ ला मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेज ची स्थापना केली .
- गोखलेंची ‘सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी’ च्या स्थापने मागे भाऊ दाजी लडांचीच प्रेरणा होती.
- त्यांनी ज्ञानप्रसारक सभा ही संघटना स्थापन केली.
- १८७४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
Comments
Post a Comment