ऑस्कर पुरस्कार २०१७ :-
२०१७ चा ८९ वा अकादमी पुरस्कार सोहळा २६ फेब्रुवारी २०१७ रोजी अमेरिकेतील लॉस एंजिल्स या शहरा मधील डॉल्बी थिएटर मध्ये आयोजित करण्यात आला होता.
विनोदी अभिनेता जिमी किमेल याने या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
ला ला लँड या चित्रपटाने सर्वाधिक १४ नामांकने मिळवून सर्वाधिक नामकने मिळवून सर्वाधिक नामांकानाचा विक्रम नोंदवला. तसेच ला ला लँड या चित्रपटाला सर्वाधिक ६ पुरस्कार मिळाले.
गेल्या वर्षीचा सर्वीत्कृष्ट चित्रपट म्हणून स्पॉटलाईट या चित्रपटाची निवड झाली होती.
याचबरोबर अराइवल व मूनलाईट या चित्रपटानीं दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक आठ नामांकने मिळवली.
ऑस्कर पुरस्कार २४ प्रकारात देण्यात आला.
त्यापैकी देण्यात आलेले महत्वाचे पुरस्कार खालील प्रमाणे :-
- सर्वोत्कृष्ट चित्रपट या श्रेणीत मूनलाईट याचित्रपटाला पुरस्कार मिळाला.
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार केसी अफ्लेक याला मेनचेस्टर बाय द सी चित्रपटासाठी मिळाला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एम्मा स्टोन हिला ला ला लैंड या चित्रपटासाठी मिळाला.
- सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार महेर्शाला अली याला मूनलाईट या चित्रपटासाठी मिळाला. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार विओला डेव्हिस हिला फेंसेस या चित्रपटासाठी मिळाला.
- सर्वोत्कृष्ट परदेशी भाषिक चित्रपट म्हणून असगर फरहादी दिग्दर्शित ‘द सेल्समन’ या चित्रपटाला मिळाला.
- सर्वोत्कृष्ट विज्युअल इफेक्ट या श्रेणीत ‘द जंगल बुक’ या चित्रपटाला पुरस्कार मिळाला.
- सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर चित्रपटासाठी ‘झूटोपिया’ या चित्रपटाला तर सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म साठी ‘पायपर’ या चित्रपटाला पुरस्कार मिळाला.
- सर्वोत्कृष्ट डॉक्युमेण्ट्री फिचर फिल्मचा पुरस्कार ओजे मेड इन अमेरिका याला मिळाला.
● ला ला लॅण्ड या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट
प्रॉडक्शन डिआइन साठी डेव्डिड वॅस्को यांना
पुरस्कार देण्यात आला.
Comments
Post a Comment