- केंद्र सरकारचे महत्वाचे निर्णय व कायदे :-
१)नीती आयोग, औद्योगिक धोरण आणि
प्रोत्साहन विभाग आणि भारतीय उद्योग
महासंघाने एकत्रितपणे ‘भारत नाविन्यता
निर्देशांक’ सुरू केला आहे.
- देशाच्या पहिल्या ऑनलाईन नाविन्यता
निर्देशांक पोर्टलच्या माध्यमातून नाविन्यतेनुसार
राज्यांची क्रमवारी निश्चित केली जाईल.
- नीती आयोग या पोर्टलवरील माहिती
नियमितपणे अद्ययावत करेल.
२) केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भारतीय माहिती
तंत्रज्ञान संस्था (सुधारणा) विधेयक, 2017 ला
मंजूरी दिली.
- सुधारणा विधेयकामुळे भारतीय माहिती
तंत्रज्ञान डिझाईन आणि वस्तुनिर्माण संस्था
(आयआयआयटीडीएम), कुर्नल तसेच इतर
आयआयटींचा समावेश मुख्य कायद्यात होईल.
- कायद्यान्वे आयआयआयडीएम कुर्नुलला
विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याच्या
अधिकारासह राष्ट्रीय संस्थेचा दर्जा जाहीर.
- यआयटीडीएमचा खर्च मनुष्यबळ विकास
मंत्रालयाच्या योजना निधीतून केला जाईल.
३) 36 जणांना जीवन रक्षा पदक मालिका
पुरस्कार 2016 द्यायला मंजुरी दिली असून
यापैकी 5 जणांना सर्वोत्तम जीवन रक्षा, 8
जणांना उत्तम जीवन रक्षा आणि 23 जणांना
जीवन रक्षा पदक देऊन गौरवण्यात आले .
- यापैकी 7 पदके मरणोत्तर देण्यात आले.
-महाराष्ट्रातील गोविंद तुपे यांना उत्तम जीवन
रक्षा पदक तर तेजेश सोनावणे, मनोज बाराहाते आणि नीलकांत हरिकंत्रा यांना जीवन रक्षा पदक
देण्यात आले.
४) राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा कायदा 2013
अंतर्गत 75 टक्के ग्रामीण जनतेला आणि 50
टक्के शहरी जनतेला स्वस्त दरात अन्नधान्य
मिळते.
- 24 जानेवारी 2017 पर्यंत शिधापत्रिकांचे
100 टक्के डिजिटायझेशन झाले आहे.
Comments
Post a Comment