सामान्य विज्ञान इयत्ता ५ वी ते १० वी महत्वाच्या नोट्स: भाग १

सामान्य विज्ञान इयत्ता ५ वी: - 



(१) मानवी शरीर व काही अंतरींद्रीय:-
- मेंदू हा शरीराच्या सर्व अवयवाचे व त्याच्या 
  कार्याचे नियंत्रण करतो .
-  केसा सारख्या लहान रक्त वाहिन्यांना 
   "केशवाहिन्या" म्हणतात.



(२) अन्नपचन :-
- अन्नाचे पचन अन्ननलिकेत होते.
- अन्नपचनाचा क्रम : तोंड→ग्रासिक→जठर→
लहान आतडे→मोठे आतडे→गुदद्वार.


(३) आहार :- 
- व्यक्तीच्या गरजेनुसार सर्व अन्नघटक पुरेशा व
योग्य प्रमाणात घेणे म्हणजेच " संतुलित आहार"
  किंवा "चौरस आहार" होय.
- काही अन्नघटकाच्या कमतरते मुळे विकार  
  जडतात त्याला अभावजन्य विकार किंवा 
  त्रुटीजन्य विकार म्हणतात .

अ) जीवनसत्त्वाच्या कमतरते मुळे होणारे  
  विकार व उपाय :-

- ए जीवनसत्व → रातांधळेपणा →आहारात 
  पालेभाज्या,पिकलेली फळे,पपई, दूध.

- बी जीवनसत्व - जीभ लाल होणे , त्वचा
  खरखरीत होणे- आहारात पालेभाज्या,दूध

- सी जीवनसत्व - हिरड्यातून रक्त येणे- 
  आहारात आवळा लिंबू, संत्रे, मोड आलेली 
  कडधान्य.

- डी जीवनसत्व - पायाची हाडे वाकणे,पाठीला 
  बाक येणे- कोवळा सूर्यप्रकाश, शर्कलिव्हर   
  ऑइल व कॉडऑइल.
  
- अन्नपदार्थ अंबावल्यामुळे जीवनसत्वात वाढ
  होते व त्याची पौष्टीकता वाढते.
- अन्नपदार्थ जास्त काळ शिजवल्यावर त्यातील
  काही जीवनसत्व नाश पावतात.



(४) रोगजंतू व रोगप्रसार :
-  क्षय,घटसर्प हे संसर्गजन्य रोग आहेत.

- टॉयफॉईड, कॉलरा, जुलाब आतड्याचे रोग.
- कावीळ,टॉयफॉईड,कॉलर, पोलिओ,हगवण
या रोगांचा प्रसार पाण्यामार्फत होतो.
- खरूज,नायटा यांसारखे रोग संपर्कजन्य आहेत
- हिपॅटॅटिस बी " हा कावीळाचा प्रकार आहे .



(५) रोगप्रतिबंध :-
  लसिंचे नाव :-
- BCG - घटसर्प, डांग्या खोकला,धनुर्वात.
- पोलिओ - पोलिओ
- गोवर - घटसर्प, धनुर्वात.



(६)नैसर्गिक साधनसंपत्ती :-
-  खाणीतून मिळणाऱ्या दगडापासून धातू 
  बनवतात त्याला धातूपाषाण म्हणतात.
- खडकापासून मातीचा २.३ सेमी थर तयार 
  होण्यासाठी ८०० ते १००० वर्ष लागतात.
- डोंगर उतारावर घातलेल्या बांधांना ताली किंवा
  ओटे म्हणतात.



(७) पदार्थाचे कणस्वरूप :-
- पदार्थ द्रव्याचे बनलेले असतात.
- द्रव्याला वस्तुमान असते.
- पदार्थ जेव्हा दार्व पदार्थात विरघळतात तेव्हा
  त्यांचे सूक्ष्म कण सुटे होऊन द्रवात मिसळतात.



(८) पदार्थाचे गुणधर्म :- 
- उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या  
  पदार्थाना उष्णतेचे "सुवाहक " म्हणतात .
  उदा. तांबे ,सोने, चांदी,अल्युमिनियम,लोखंड.
- उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणाऱ्या 
  पदार्थांना "उष्णतेचे दुर्वाहक" म्हणतात.
उदा. प्लास्टिक,ऑक्रीलीक,रबर,लाकूड,  
  कागद, कापड इ.
-चुंबकीय पदार्थ - लोखंड,कोबाल्ट,निकेल.



(९) बदल :-
- पुन्हा -पुन्हा उलट-सुलट क्रमाने होऊ 
  शकणाऱ्या बदलांना "परिवर्तनीय बदल "
   म्हणतात.
- ठराविक कालावधीनंतर पुन्हा-पुन्हा घडून 
  येणारे बदल म्हणजे "आवर्ती बदल"
उदा. भरती-अहोटी, घड्याळाचा काटा.
- पुन्हा- पुन्हा घडणाऱ्या बदलातील कालावधी
  सामान नसल्यास अशा बदलांना "अनावर्ती 
  बदल "म्हणतात.
उदा- भूकंप,त्सुनामी, वादळ.



(१०) भौतिक बदल :-
- जे बदल घडताना मूळ पदार्थ आहे तसाच
  राहतो , नवीन पदार्थ तयार होत नाही अशा
  बदलांना भौतिक बदल म्हणतात.
- उष्णतेमुळे द्रवाचा वाफ तयार होणे याला 
  बाष्पीभवन म्हणतात . या उलट वाफ थंड 
होऊन पुन्हा तिच्यापासून द्रव बनणे याला
  संद्रीभवन म्हणतात.



(११) रासायनिक बदल :- 
- जे बदल झाल्यामुळे मूळ पदार्थाचे रुपांतर 
  नवीन गुणधर्माच्या पदार्थात होते त्याला 

रासायनिक बदल म्हणतात.

उदा- क्षरण व ज्वलन.

 

Comments