- अर्थसंकल्पातील महत्वाचे अधोरेखित मुद्दे :- २०१७-१८

देशाच्या अर्थसंकल्पातील महत्वाचे अधोरेखित मुद्दे :- २०१७-१८



-गरिबी निर्मुलन आणि पायाभूत सुविधा विकास 
  या दोन क्षेत्रांवर यंदाच्या बजेटमध्ये भर.

१) कर:-अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न     असलेल्या वर्गाकडून आता 10 ऐवजी 5 
     टक्केच प्राप्तिकर आकारण्यात येणार 
-  50 लाख ते कोटी असलेल्यांच्या उत्पन्नावर 
   10 टक्के सरचार्ज लावण्यात येणार .
-  राजकीय पक्षांना २ हजार पेक्षा जास्त निधी  
   रोखीत घेता येणार नाहीे चेक आणि डीजीटल  
    माध्यमातून निधी स्वीकारावा लागेल .
-  50 कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना 
    आयकरामध्ये 5 टक्के सवलत.
-   रेल्वेच्या E-ticket आरक्षणावर सेवाकर  
    नाही लागणार.

२) गेल्या आर्थिक वर्षात  भारतातील परदेशी  
     गुंतवणुकीत 36 टक्क्यांनी वाढ .

४) आयकराच्या महसुलात 17 टक्क्यांनी वाढ .
५) २.५ हजार कोटी डिजिटल घेवाण देवाण 
     लक्ष्य.

६)  व्यापाऱ्यांसाठी कॅशबॅक योजना.
७)  कर्जबुड्यांविरोधात स्वतंत्र कायदा करण्यात 
     येणार.

८)  पोस्ट ऑफिस मुख्यालयातूनही पासपोर्ट 
    मिळणार.
-   पोस्ट ऑफिसच्या सहकाऱ्याने डिजीटल 
     योजना लागू होणार.

९)  परकीय गुंतवणूक महामंडळ रद्द.
१०) ग्रामपंचायती ब्रॉडबँडने जोडणार .
११) २०२५ पर्यंत भारताला टीबीमुक्त करणार.
१२) यूजीसीमध्ये सुधारणार करणार.
१३) ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट हेल्थ कार्ड देणार.
१४) गर्भवती महिलांच्या खात्यात ६ हजार रुपये 
   जमा केले जातील.

१५) १ मे २०१८ पर्यंत देशातील प्रत्येक गावात  
    वीज .

१६) पीक विमा आता ३० टक्क्याऐवजी ४०
     टक्के.

Comments