महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा २०१७ - भाग १

भारतीय राष्ट्रीय चिन्हे :




१)भारतीय राष्ट्रगीत - जन गन मन ची रचना 

   रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत केली .
   १९११ ला याचे हिंदी भाषेत रूपांतर 
   करण्यात आले.
● राष्ट्रगीताचे प्रथम गायन २७ डिसेंम्बर १९११
   ला कोलकत्ता येथील अधिवेशनात झाले होते.
● मूळ गीत पाच कडव्याचें आहे पण यातील 
   पहिल्या कडव्यास राष्ट्रगीत म्हणून मान्यता .
● राष्ट्रगीताला घटना समितीची मान्यता २४जाने
   १९५० ला मिळाली.
● राष्ट्रगीत गण्यास ५२ सेकंदाचा कालावधी 
  लागतो.
● रवींद्रनाथ टागोर यांनीच राष्ट्रगीताचा इंग्रजी 
   अनुवाद "Morning Song Of India" या
   नावाने केला.



२) राष्ट्रीय गीत :- 

वंदे मतरम् या राष्ट्रीय गीताची निवड बंकिंचंद्र
   चॅटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीतुन 
   करण्यात अली .
● राष्ट्रीय गीताचे प्रथम गायन १८९६ च्या 
   कोलकत्ता अधिवेशनात झाले.


३) राष्ट्रीयचिन्ह :-

● भारताचे राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा आहे.
● याची निवड सम्राट अशोकाच्या सारनाथ
   येथील स्तंभा वरून झाली .
● भारत सरकारने याचा सावकार २६ जानेवारी
   १९५० ला केला .
● राष्ट्र चिन्हात सिंह,घोडा व बैल या प्राण्यांची
  प्रतिकात्मक चित्र आहेत .
● चार सिंहन पैकी तीन सिंह पुढच्या बाजूस व 
  एक पाठीमागे आहे .
● राष्ट्रचिन्हाच्या खालच्या बाजूस घोडा व  
  डाव्या बाजूस बैल असे धम्मचक्र आहे.
● राष्ट्रचिन्हाखाली "सत्यमेव जयते" हा "मुंडक
  उपनिषदातून घेतलेला संदेश देवनागरी लिपीत
  आहे . 
● सत्यमेव जयते हे वाक्य पं. मदनमोहन 
   मालवीय यांनी सुचवले .




३) भारतीय राष्ट्रधवज :-

● २२ जूलै १९४७ ला घटना समितीने तिरंगा  
   ध्वजास राष्ट्रध्वज म्हणून मान्यता दिली .
● तिरंग्याची रचना मच्छलीपटनंम् येथील पिंगली 
   वेंकय्या हयानीं केली.
● तिरंग्यात सर्वात वर केशरी ,मध्यभागी पांढरा
   व सर्वात खाली हिरव्या रंगाचा पट्टा आहे.
● केशरी रंग हा शौर्य व त्यागाचे प्रतीक आहे.
● पांढरा शांतता व पावित्र्याचे .
● हिरवा समृद्धीचे प्रतीक.
● मध्यभागी सारनाथ येथील अशोक 
  स्थंभावरून घेतलेले निळसर रंगाचे अशोक
  चक्र आहे जे गौतम बुद्धाच्या उपदेशा नुसार
अष्टांग मार्गाचे प्रतीनिधीत्व व न थांबणाऱ्या
गती व प्रगतीचे द्योतक आहे .
● यात २४ आरे आहेत.
● राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे गुणोत्तर २:३ 
  आहे.



४)राष्ट्रध्वजाचा आकार :-
- अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या विमानावर  
  ४५०×३०० mm तर राजकीयदृष्ट्या 
  महत्वाच्या व्यक्तींच्या मोटारीवर २५०×१००
  mm. आकाराचा तिरंगा लावतात.



५) राष्ट्रीय पंचांग( Calander ): - 

● भारताचे राष्ट्रिय कॅलेंडर शक कालगणनेवर
  आधारित ३६५ दिवसाचे आहे . इंग्रजी 
   कॅलेंडरच्या ७८ वर्ष मागे आहे .
● याला २२ मार्च १९५७ ला मान्यता भेटली.
● राष्ट्रीय कॅलेंडर नुसार नवंवर्षाची सुरुवात चैत्र 
  शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुडीपाडव्याला  
   (२२मार्च) होते. लीप वर्षात २१ मार्च ला 
   सुरवात.



६) राष्ट्रीय खेळ :- हॉकी 
● १९२८-५६ दरम्यानच्या सर्व ऑलम्पिक  
मधील(६) भारताने स्वर्णपदक मिळवले.



७) राष्ट्रीय फळ :- आंबा .

● उष्ण कटिबंधीय प्रदेशात व्यापक प्रमाणात
  येणार आणि महत्वाचे फळ आहे.
● मेग्‍नीफेरा इंडिका हे त्याचे  शास्त्रीय नाव आहे.



८)राष्ट्रीय जलचर :-

● गोड्या पाण्यातील डॉल्फिन हा राष्ट्रीय जलचर
  प्राणी आहे.
● हा प्राणी भारत ,नेपाळ,भूतान आणि 
   बांगलादेश मधील गंगा,मेघन, ब्रह्मपुत्रा आणि
   बांगलादेशच्या कर्णफुली नदीत आढळतो.








 

Comments