सामान्य विज्ञान इयत्ता ६ वी : ५ ते १० वी पाठयपुस्तक नोट्स भाग २

सामान्य विज्ञान इयत्ता ६ वी :


(१) सजीवांची लक्षणे :
- सजीवांचे शरीर पेशींचे बनलेले असते .
- शरीराच्या आकारानुसार पेशींची संख्या कमी  
  अधिक असते .
- अमिबा, पॅरॅमिशीयम,क्लोरोला,यीस्ट या 
  सजीवांचे शरीर एका पेशींचे असते.
- माणसाची वाढ जन्मापासून वयाच्या १८ ते २५
  वर्षा पर्यंत होते.
- सजीव स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण
  करतात याला प्रजनन म्हणतात.
- प्राणी  व  त्यांची आयुमर्यादा
- घरमाशी १ ते ४ महिने.
- कुत्रा १६ ते १८ वर्ष.
- शहामृग ५० वर्ष.
- घोडा ५० वर्ष.
- गोऑफिश १० वर्ष.


(२) सजीवांचे वर्गीकरण :-
- वनस्पतीच्या वर्गीकरणासाठी "कॅरोलस
लिनियास" यांनी सुचवलेली वनस्पतीच्या
वर्गीकणाची पद्धत सर्वत्र वापरली जाते.
- वनस्पतीचे वर्गीकरण
अ) अपुष्प वनस्पती :- फुले न येणाऱ्या वनस्पती
उदा. बुरशी, भूछत्र,कवक,नेचे,स्पारोगायरा.
ब) सपुष्प वनस्पती :- फुले येणाऱ्या वनस्पती.
उदा. आंबा,धोतरा,रातराणी,जाई इ.
- खोडाची उंची आणि त्यांच्यावरील फांद्या
यांच्या फारकावरून वनस्पतीचे वृक्ष ,झुडूप,
  वेल, रोपटे असे वर्गीकरण होते.
- वनस्पतींच्या जीवनचक्र पूर्ण होण्याच्या
कालावधी वरून बहुवार्षिक( आंबा,वाद,पिंपळ)
द्विवार्षिक(मुळा, गाजर,बीट), वार्षिक(सूर्यफूल,
ज्वारी,बाजरी) असे वर्गीकरण करता येते.

-प्राण्याचे वर्गीकरण
अ) एकाच पेशी पासून बनलेले एकपेशीय.-
अमिबा,पॅरामेशीयम .
ब) अनेक पेशींचे बनलेले बहुपेशीय- मुंगी,उंदीर
   हत्ती.
- पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना "पृष्ठवंशिय"
प्राणी म्हणतात. माकड,साप,ससा,बेडूक.इ
- पाठीचा कणा नसलेले अपृष्ठवंशीय प्राणी.
- अपृष्ठवंशिय प्राण्याचा मेंदू पृष्ठवंशीय
  प्राण्याच्या तुलनेत कमी विकसीत असतो.
- अंड्यातून जन्म घेणाऱ्यांना "अंडज" तर
  पिल्लांना जन्म देणाऱ्या प्राण्यांना "जारायुज"
  म्हणतात.


(३) वनस्पतीचे अवयव व रचना :-
अ ) मूळ - बीजमध्ये अदिमुळं व अंकुर हे भाग
  असतात.
- अदिमुळा पासून मुळांची वाढ जमिनीच्या
  खाली होते.
- मुळांच्या टोकाच्या भागावर केसा सारखे धागे
  असतात त्यानां "मूलरोम" म्हणतात.
- टोकांना इजा होऊ नये म्हणून "मुळंटोपी"

ब) खोड - खोडावर ज्या ठिकाणी पेरे असतात
  त्या ठिकाणी पाने फुटतात.
- खोडातील दोन पेरांतील अंतराला "कांडे"
  म्हणतात.
- पेर आणि पान यांच्यातील कोंबसारख्या
  दिसणाऱ्या भागाला "मुकुल" म्हणतात.-
  मुकुलापासून खोडाची उंची वाढते.

क) पान - पानांच्या पसरट भागाला "पर्णपत्र"
  व पर्णपत्रा कडेला "पर्णधारा" आणि
  पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला "पर्णाग्र"
   म्हणतात.

ड) फुल - फुलं ज्या ठिकाणी येते त्याला
"पुष्पधार" म्हणतात
- "निद्लपुंज" सर्वसाधारणपने हिरव्या रंगाचे
  असते व ते फुलाचे सर्वात बाहेरील मंडल
  असते.
- "दलपुंज" म्हणजेच फुलाच्या पाकळ्या.
- पुमंग पुंकेसराचा बनलेला असतो तर जायांग
  स्त्रीकेसराचा बनलेला असतो.
- पुष्पधारावरील "जायांग" हे सर्वात आतील
  मंडळ.


(४)मापन :-
- प्रमाणित मापाला "एकके" म्हणतात.
- एक हेक्टर म्हणजे १० चौरस मीटर एवढी
  जमीन
- एखाद्या भांड्यात किती द्रव मावेल याला
त्या भांड्याची "धारकता किंवा क्षरणक्षमता"
म्हणतात.
- प्रचलित मापन पद्धती (M.K.S) :-
   -लांबी - मीटर मध्ये.    (M)
   - वस्तुमान- किलोग्रॅम  (K)
   - काळ  -   सेकंद        (S)
- CGS पद्धत :-
   - लांबी - सेमी (C)
  - वस्तुमान- ग्रॅम(G)
  -  काळ  - सेकंद(S)
-  गोलंदाजीच्या वेगाचे मापन रडार पद्धतीने 
  केले जाते .


(५) बल :-
- वस्तू हालवण्यासाठी बलाची आवश्यकता 
  असते.
- बलांचे प्रकार:-
अ) स्नायू बल -  शरीराच्या भागाकडून लावले
  गेलेले बल.

ब) यांत्रिक बल - यंत्रामुळे लावले गलेले बल.

क) गुरूत्वीय बल - गुरुत्वाकर्षणाद्वारे लावलेले
  बल.

ड) चुंबकीय बल - चुंबकामुळे लावले गेलेले
बल.

इ)घर्षण बल - वस्तू आणि पृष्ठभाग यांच्या मध्ये
  कार्यरत असणारे बल.

ई) स्तिथीक विदुयत बळ - घर्षणामुळे वीज
निर्माण होऊन तयार होणारे बल.


(६) गती आणि गतीचे प्रकार :-
- एकाच दिशेने जाणाऱ्या गतीला रेषीय गती
  म्हणतात . उदा- मुंग्यांची रांग.
- ठरावीक अंतर विशिष्ठ वेळेत पार करणाऱ्या
  गतीला एकसमान गती म्हणतात.
- वारंवार होणाऱ्या अंदोलनामुळे प्राप्त होणारी
  गती आंदोलीत गती. उदा- झोपाळा.
- ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठरावीक वेळेनंतर
  एका विशिष्ट बिंदूत जाते त्याला
  नियतकालिक
  गती म्हणतात. उदा- सूर्यभ्रमण.
- ज्या गतीची दिशा सतत बदलत जाते तिला
  यादृच्छिक गती म्हणतात . उदा- रांगते बाळ.
                     पार केलेले अंतर
- चाल =   -----------------------------------------
              अंतर पार करण्यास लागणारा वेळ
- अधाराभोवती हालणाऱ्या व नवाकणाऱ्या
  दांड्याला तरफ म्हणतात.


(७) कार्य आणि ऊर्जा :-
- जेव्हा बल लावून एखाद्या वास्तूला गतिमान  
  केले जाते किंवा गतिमान वस्तूची दिशा
  बदलली जाते तेव्हा कार्य झाले असे म्हणतात.
- कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात .
- कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेले
  स्थानांतर दोन्हीचा उपयोग होतो.
- शुद्ध  सिलिकॉनच्या पातळ नळ्या वापरून
  सौरघट बनवतात .


(८) पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती :-
- पाण्यात मातीचे कण तळाशी जाऊन 
  बसण्याच्या क्रियेला निक्षेपण म्हणतात.
- काही स्थायू नां उष्णता दिल्यास त्याचे रूपांतर
  द्रवात न होता एकदम वायूत होते त्याला
  संप्लवन म्हणतात.


(९) इंद्रिय संस्था :-
- ठरावीक काम एकत्रित करणाऱ्या इंद्रिय
  समूहाला इंद्रिय संस्था म्हणतात.
- दात,जीभ,जठर,लहान आतडे,मोठे आतडे,
  लाळग्रंथी,आंत्रग्रंथी, यकृत,स्वादुपिंड ही सर्व
  पचनिद्रिय आहेत.
- लाळेमध्ये टायलींन नावाचा पाचक रस
असतो.
- लहान आतड्यात आंत्ररस,पित्तरस,स्वादुरस
  असतो.
- श्वसन संस्था -- नाक- श्वसननलिका-वायूकोश-
  फुफुस - श्वासपटल.


(१०) आपली पृथ्वी आणि तीची वैशिठ्ये :-
- पृथ्वी सूर्यापासून सुमारे १५ कोटी किमी.
  अंतरावर आहे.
- नायट्रेट्स चा वनस्पती वाढीसाठी उपयोग 
  होतो.
- पृथीचा ७१% भूभाग पाण्याने व्यापलेला .
- सजीवांच्या मृत अवशेषापासून खनिजतेल
  बनण्याची प्रक्रिया सागरताळात घडते.

- भू-कवच -
-  पृथीच्या सर्वात बाहेरचा भाग .
- जाडी जमिनीखाली ३० ते ७० किमी. तर 
   समुद्राखाली ५ ते ६ किमी.
- यात प्रामुख्याने अल्युमिनियम, मॅग्नेशिअम
   आणि सिलिकॉन ही खनिजे असतात.
- पृथ्वीच्या एकूण आकारमानाच्या २% भूभाग
   भूकवचाचा.

- माध्यावरण -
- भू-कवचापासून ७० ते २९०० किमी.
- एकूण आकारमानाच्या ८२% भाग.
- लोह व मॅग्नेशिअम चा बनलेला.
- माध्यावरणातील ४०० किमी. खोलीपर्यंतचा
  भाग खडक वितळून बनलेल्या रसाचा.

-गाभा -
- माध्यावरणा नंतरचा भाग,अत्यंत उष्ण.
- एकूण आकारमानाच्या १६% भाग .
- गाभ्याचे दोन भाग-
अ) मधयावरणा जवळचा भाग.
  ब) केंद्राजवळचा भाग (१२००किमी).
- गाभा लोखंड व निकेल चा बनलेला .
- गाभ्यातील द्रवाचा तापमान ४०००° से. पेक्षा
  जास्त.
- महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे
निर्माण होणारी लाटांना त्सुनामी म्हणतात.


(११) आपले पर्यावरण :-
- पर्यावरणात जैविक व अजैविक घटकाचे
  वास्तव्य.
- समुद्रसपाटीपासून १७ ते २६ किमी.
  उंचीवरच्या वातावरणाच्या थरात ओझोन वायू.
- १६ सप्टें. हा दिवस ओझोन संरक्षण दिन
  मानला जातो.



Comments