■ भारतातील प्रमुख नद्या :-
- कोणत्याही प्रदेशातील नद्यांचे प्रवाहमार्ग
तेथील प्राकृतिक रचना , खडकांची रचना
उताराचे स्वरूप यावर अवलंबुन असतात .
● हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या :-
- या नद्यांना वर्षभर पाणी असते .
१) गंगा :-
- भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी असून
या नदीचे खोरे भारतीतील सर्वात जास्त मोठे
खोरे आहे .
- या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो.
- गंगा नदी उत्तराखंड , बिहार, प. बंगाल या
राज्यांतून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास
मिळते .
- यमुना हि गंगेची प्रमुख उपनदी आहे . तिचा
उगम हिमालयात यमनोत्री येथे होतो.
- हुगळी ही गंगेची पहिली व प्रमुख वितरिका .
- गंगा नदीने आपल्या मुखाशी विस्तृत प्रदेश
निर्माण केला आहे . या त्रिभुज प्रदेशास
"सुंदरबन" म्हणतात . हा जगातील सर्वात मोठा
त्रिभुज प्रदेश आहे .
२) ब्रम्हपुत्रा :-
- ब्रम्हपुत्रा नदीचा उगम तिबेट मध्ये मान सरोवर
येथे होतो .
- अरुणाचल प्रदेश मध्ये ती दिहांंग या नावाने
वाहते. पुढे आसाम राज्यातून वाहताना तिला
ब्रम्हपुत्रा म्हणतात .
- ब्रम्हपुत्रेचा प्रवाहमार्ग भारतात कमी आहे .
- या नदीच्या पात्रात आसाम राज्यात अनेक बेटे
तयार झालेली आहेत. यापैकी मजुली हे बेट
नदीपात्रातील जगातील सर्वात मोठे बेट आहे .
- सुबनासिरी, मानस व तिस्ता या ब्रह्मपुत्रेच्या
प्रमुख उपनद्या आहेत .
- वारंवार येणाऱ्या पुरासाठी हि नदी प्रसिद्ध
आहे.
३) सिंधू :- नदीचा उगम तिबेट मधील मान
सरोवर येथे होतो.
- नदी जम्मू काश्मीर राज्यातून वाहत जाऊन
पाकिस्तानात जाते .
- भारतात सिंधू नदीच्या प्रवाहाची लांबी कमी
आहे .
- श्लोक , गिलगिट, झेलम, चिनाब, रावी, बियास
सतलज या हिमाचल प्रदेश व पंजाबमधील
सिंधूच्या प्रमुख उपनद्या आहेत .
● भारतीय पठारावरील नद्या :-
- पठारावरील नद्या पश्चिम घाट, विंध्य, सतपुडा,
अरवली या पर्वतरांगा मध्ये उगम पावतात .
१) नर्मदा :-
- नदी अमरकंटक येथे उगम पावते .
- ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम
वाहिनी नदी आहे .
- नर्मदा छत्तीसगढ, मध्य प्रदेश,महाराष्ट्र व
गुजरात राज्यांतून वाहते .
- नर्मदा नदीवर जबलपूर जवळ धुवाँधार धबधबा
आहे .
२) तापी :-
- नदीचा उगम सातपुडा पर्वतात मूलताई जवळ
होतो .
- ही पश्चिम वाहिनी नदी आहे .
- तापी मध्ये प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या
राज्यांतून वाहते .
- पूर्णा ही तापाची प्रमुख उपनदी आहे .
३) महानदी :-
- महानदीचा उगम छत्तीसगड राज्यातील बस्तर
डोंगररांगा मध्ये होतो.
- ही नदी प्रथम उत्तर नंतर पूर्व दिशेने ओरीसा
राज्यातून वाहते .
- महानदीने किनारी प्रदेशात मोठा त्रिभुज प्रदेश
तयार केला आहे .
४) गोदावरी :-
- भारतीय पठारावरील सर्वात जास्त लांबीची
नदी असून गंगा नंतर भारतातील २ ऱ्या
क्रमांकाची मोठी नदी आहे .
- गीदावरीचा उगम सह्याद्रीतील त्रंबकेश्वर येथे
होतो .
- महाराष्ट्र व आंध्रप्रदेशातून वाहते .
- मांजर, प्राणहिता, इंद्रावती इ. गोदावरीच्या
प्रमुख उपनद्या आहेत .
५) कृष्णा :-
- नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वर
येथे होतो .
- कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या
राज्यांतून वाहते .
- भीमा व तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनद्या
आहेत .
६) कावेरी :-
- ही दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे .
- कर्नाटक राज्यातील ब्रम्हगिरी डोंगरात कावेरी
चा उगम होतो.
- कावेरी नदी कर्नाटक व तामिळनाडू राज्यातून
वाहते.
- भवानी, अमरावती व कावेरी या तिच्या प्रमुख
उपनद्या आहेत.
७)भीमा :-
- पश्चिम भारतातील प्रमुख नदी आहे .
- नदीचा उगम महाराष्ट्रातील भीमाशंकर येथे
उगम पावते.
- भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत .
- मुळा, कुंडली, माणगंगा या भीमेच्या प्रमुख
उपनद्या आहेत .
Comments
Post a Comment