एन.के .सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 15 व्या वित्त आयोग स्थापन.


15 वा वित्त आयोग :- 






- एन. के. सिंग यांच्या अध्यक्षेते खाली 15 व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली असून या आयोगाचा कार्यकाळ 2020 ते 2025 असा पाच वर्षांचा असणार आहे . एन.के .सिंग यांच्या व्यतिरिक्त आयोगात इतर चार सदस्यांचा समावेश असणार आहे . या सदस्यता प्रमुख्याने     माजी अर्थीक सचिव शशिकांत दास, माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉ.अशोक लाहिडी,नीती आयोगाचे सदस्य डॉ .रमेश चंद आणि जॉर्जटाऊन विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.अनुप सिंग यांचा समावेश आहे.
नीती आयोगाचे सदस्य याचे पार्ट टाइम सदस्य असणार आहेत.
आयोगाला आपला अहवाल 2019 पर्यंत सादर करायचा आहे.

एन के सिंग  यांच्या विषयी :-  
- GAAT,UNACDT, UN यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व
केलं.
- 2001 ते 2014 योजना आयोगाचे सदस्य.
- 2006 ते 2008 मध्ये बिहार राज्य योजना मंडळाचे
उपाध्यक्ष.
- तसेच 2008 ते 2014 या कालावधीत राज्यसभे चे सदस्य.

* वित्त आयोगाविषयी महत्त्वाची माहिती :- 

- वित्त आयोगाची स्थापना प्रत्येक पाच वर्षांनी राष्ट्रपतीद्वारे करण्यात येत. याचे कार्य Finance Act-1951 द्वारे चालते. याची तरतूद  संविधानात कलम 280 मध्ये करण्यात आली आहे.
कार्य :- करांचे केंद्र आणि राज्य यांच्यात सामन वाटप करणे. याचे स्वरूप पूर्णतः सल्लागार स्वरूपाचे असते.
भारतात 1952 ते 1957 या कार्यकाळात पहिला वित्त आयोग स्थापन करण्यात आला ज्याचे अध्यक्ष के.सी.नियोगी हे होते. तर 2015 ते 2020 या कार्यकाळात स्थापन करण्यात आलेल्या 14 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय.व्ही.रेड्डी हे होते.

Comments